HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा गुंडाराज सुरु- इम्तियाज जलील

औरंगाबाद | १०० कोटींचा भूखंड घोटाळ्या प्रकरणी न्याय न मिळाल्यास येत्या २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

जालना रोड औरंगाबाद लगद वक्का बोर्डाच्या जागांवर अवैधरित्या अतिक्रमण करून बेकायदेशीर आणि नियमबाह्य बांधकाम करून जवळपास शंभर कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याची व त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जर आमची मागणी मान्य झाली नाही, तर २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सामूहिक आमरण उपोषण करणार असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. असा इशाराही खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

तसेच राज्यामध्ये खुलेआम हातामध्ये शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षाच्या गुंडांवर थेट कारवाई करण्याची मागणी देखिल खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत, त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, गाडीवर एका राजकीय पक्ष म्हणजे शिवसेनेचा लोगो असून चालक तसेच गाडीत बसलेल्या इतर लोकांच्या हातात बंदुक आहे. ते इतरांना धमकवत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गुंडाराज कधी थांबणार असं असा सवाल विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचा डंका ! मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत,यादीतही पहिलचं नाव…

News Desk

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, फडणवीसांची टीका

News Desk

कळसकरचा ताबा मिळविण्यासाठी सीबीआयने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

News Desk