HW News Marathi
महाराष्ट्र

अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक तर पिचड पितापुत्रावर निशाणा!

शिर्डी | विधानसभा निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या सोडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनमध्ये पवारांचे विश्वासू नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हेही होते.आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नगर दौऱ्यात पिचड यांच्यावर निशाणा साधला होता. आज पुन्हा अजितदादांनीही पिचडांवर बोलताना भाजपत गेल्यापासून त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार भाषणात म्हणाले,”काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले”, असं म्हणत खास त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी पिचड विषयावर भाष्य केलं.

तर दुसरीकडे कृषी कायद्यासंदर्भात शरद पवारंच्या भूमिकेचं कौतुक करताना, शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार अशा शब्दांत त्यांनी पवारांच्यी भूमिकेला पाठिंबा दिला.अजित पवार म्हणाले,’शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यताही अजित पवारांनी बोलून दाखवली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसे , पुणे पोलिसांची माहिती

Gauri Tilekar

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदांची ऑफर ?

News Desk

‘परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’, निलेश राणेंचा प्रहार  

News Desk