HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून शिवसेना खंडणी वसूल करते ! संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणारं माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मात्र, मी आज पुरावे घेऊन आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते”, असे सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवल्या आहेत. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून शिवसेना खंडणी वसूल करते”, असा गंभीर आरोप यावेळी संदीप देशपांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे आपल्या या पत्रकार परिषदेत म्हणतात कि, “शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती. मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. त्याचप्रमाणे, ‘सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार’ असे या पावतीवर लिहिण्यात आले आहे”, असाही दावा यावेळी संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा घटनेतील मृत बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत जाहीर – राजेश टोपे

News Desk

काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aprna

उरणमध्ये ‘ओएनजीसी’तील प्लांटमधून पुन्हा नाफ्ता गळती

News Desk