HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना अजून बाल्यावस्थेत नारायण राणेंची पुन्हा टीका!

मुंबई। उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना अजून बाल्यावस्थेत आहे, अशी जहरी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली. याशिवाय, ‘सामना’तून सुरु असलेल्या टीकेला १७ सप्टेंबरनंतर प्रहारमधून उत्तर देईन असं देखील राणे म्हणाले.

हा बालिशपणा आहे असं म्हटलं…

नारायण राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. काही ठिकाणी तुमचे पोस्टर फाडण्यात आले, असा प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना राणे यांनी हा बालिशपणा आहे, असं म्हटलं. “मी कार्यकर्त्यांना सांगेन की पोस्टर फाडू नका. हे लहान मुलांचे खेळ आहेत. शिवसेना अजून बाल्यावस्थेत आहे, बाहेर आली नाही आहे. त्यामुळे अशी हरकत करतायत,” असं राणे म्हणाले.

बदनामीचा खटला दाखल करणार

गेले दोन दिवस ‘सामना’च्या संपादकीयमधून राणेंवर निशाणा साधला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी १७ सप्टेंबरनंतर प्रहारमधून टार्गेट करेन असा इशारा राणे यांनी दिला. “१७ तारखेनंतर मी प्रहारमधून टार्गेट करणार. ते कुठे जाणार. कोर्टात केस आहे. त्यानंतर करणार. कशी भाषा बोलायची ना ते मी त्यांना शिकवेन. काय दर्जाचा पत्रकार? कुठे कामाला होते? काय भाषा बोलतात? ठिकेय, थोडे दिवस,” असा इशारा राणे यांनी दिला. पुढे बोलताना त्यांनी बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं. सध्या कायदेशीर सल्ला घेतोय, असं राणे यांनी सांगितलं.

माझं स्वागत करतायत माझ्या गावात

नारायण राणे यांची उद्यापासून सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर बोलताना राणे यांनी माझी काळजी म्हणून स्वागत करतात, असं म्हटलं. “माझं स्वागत करतायत माझ्या गावात. काही हरकत नाही, करुदे. माझी काळजी आहे त्यांना, पूर्वी शिवसेनेत होतो ना! शिवसेना घडवायला आताचे कोणच नव्हते. त्यांची औकात नव्हती कोणाची जे आम्ही केलं ते करायची,” असं देखील राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk

निलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती पदी बिनविरोध निवड

News Desk

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

Aprna