HW News Marathi
महाराष्ट्र

बीएमसीच्या पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेचा विजय

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या विठ्ठल लोकरे यांचा आज (१० जानेवारी) निकाल लागला आहे. लोकरेंनी भाजपचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला आहे. लोकरेंना भाजपचे बबलू पांचाळ यांचा पराभव करत ४ हजार ४२७ मतांनी विजय मिळाविला आहे. यामुळे आता शिवसेनेच्या संख्याबळात वाढ होऊन ९६वर गेली आहे.

पालिका पोटनिवडणुकीत या प्रभागात शिवसेना, भाजपा, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसह सुमारे १८ उमेदवार रिंगणात होते. २०१७ मध्ये लोकरे या विभागात काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना पक्षातून लढवली. मात्र, यात त्यांचा पराभव झाला. एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात असून त्यापैकी १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो ४ मार्गाच्या कामांचा आढावा

Aprna

गणेशोत्सवाला जाताना चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम, जाणून घ्या कोणते?

News Desk

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे राज्यभर पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन…

News Desk