HW News Marathi
देश / विदेश

कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी थोबाड फोडणार !, शिवसेना आक्रमक

मुंबई | “मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवा”, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरवर खुले आव्हान दिले आहे. मुंबई पोलीस आणि मुंबईबद्दल केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर कंगनाविषयी सर्व राजकीय पक्षांकडून, सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असतानाच आता तिने हे आव्हान दिल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. “कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही”, असा अत्यंत इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा !

“अनेक जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत. म्हणूनच येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता येईल याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”, अशा शब्दांत कंगनाने आव्हान दिले आहे. कंगनाच्या या आव्हानाला प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. कंगनाच्या या ट्विटनंतर प्रताप सरनाईकांनी देखील त्यावर आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301782810261299200?s=20

…थोबाड फोडणार !, शिवसेना आक्रमक

“कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे”, असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आणखी एक कथित सीडी व्हायरल

News Desk

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते- सामना

News Desk

भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलावा | केजरीवाल

swarit