HW News Marathi
महाराष्ट्र

भंडाऱ्यात सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा! – मनीषा कायंदे

नागपूर | भंडारा जिल्ह्यात असाहाय महिलेवर मदतीच्या बहाण्याने घृणास्पद अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 5 ऑगस्ट रोजी घडली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यानंतर पीडित महिलेची प्रकृतीची चौकशी आणि तपास कार्यातील गती जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदारा डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्यासह शिष्टमंडळाने आज (7 ऑगस्ट) नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पीडितेच्या प्रकृतीची व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडीतेवर सुरू असणाऱ्या उपचार यांची व्यवस्थित माहिती घेतली. त्यानंतर नागपूर- गडचिरोली विभागाचे विशेष महा निरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासण्या संदर्भात निवेदन दिले. याप्रसंगी नागपूर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड , किशोर कुम्हेरिया, नितीन सोळंकी जिल्हा समन्वयक, वंदना लोणकर जिल्हा संघटक रामटेक तसेच जिल्ह्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थीत होते.

कायंदेंनी निवेदनात कोणते मुद्दे मांडले

1) सदर पीडीतेला शासनाच्या मनोधर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत व समुपदेशन करण्यात यावे.
2) आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
3) सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला तात्काळ न्याय देण्यात यावा.

4) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून आहेत, कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा प्रहार

News Desk

शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनात पारित होणार – गृहमंत्री वळसे-पाटील

News Desk

पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवड होणार – बाळासाहेब थोरात

News Desk