HW News Marathi
महाराष्ट्र

ED च्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार! – प्रताप सरनाईक

मुंबई | अभिनेंत्री कंगना रनौवत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासंदर्भात बोल्यामुळे माझ्यावर कारवाई झाली आहे. आणि ईडीच्या कारवाईविरोधात मी न्यायालायत जाणार आहे, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ईडीने आज (२५ मार्च) सकाळी सरनाईकांची ११ कोटी ३६ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. एनएसईल घोटाळा प्रकरणी ईडीने सरनाईकांवर ही कारवाई केली आहे. 

ईडीच्या कारवाईनंत सरनाईक यांनी विधीमंडळाच्या प्रांगणात प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “अभिनेंत्री कंगना रनौवत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासंदर्भात बोल्ल्यामुळे माझ्यावर ईडीने ही कावारई केली आहे. ईडीने मला गेल्या आठवड्यात नोटीस पाठवली होती. ईडीच्या कारवाईविरोधात मी न्यायालात जाणार असून माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णविश्वास आहे. ईडीने माझी ११ कोटी ३६ लाखांची मालमत्ता जप्त केली. माझे हिरानंदानीतील राहते घर देखील जप्त करण्याची नोटीस ईडीने पाठवली आहे. मीरा रोड येथील जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देण्यास तयार आहे.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं!

News Desk

MPSC परीक्षा रद्द करुन सरकारने एकाच जातीचा विचार केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

News Desk

सरकार सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण

News Desk