HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवसेनेच्या आमदाराला अंडरवर्ल्डमधून धमकीचा फोन’, तर भुजबळांनी दिले हे महत्वाचे आदेश!

मुंबई। शिवसेनेचे आमदार असलेले सुहास कांदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सुहास कांदे यांना सोमवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रार केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि फोन करणाऱ्याने स्वत: ची ओळख अक्षय निकाळजे, छोटा राजनचा पुतण्या म्हणून सांगितली. निकाळजे याने कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मागे घेण्यासाठी धमकावलं. याचिका मागे न घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी चांगलं नसेल, असं म्हटल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे.

कुटुंबीयांसाठी चांगलं नसेल, असं म्हटल्याचा आरोप कांदे यांनी केला

आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि फोन करणाऱ्याने स्वत: ची ओळख अक्षय निकाळजे, छोटा राजनचा पुतण्या म्हणून सांगितली. निकाळजे याने कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मागे घेण्यासाठी धमकावलं. याचिका मागे न घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी चांगलं नसेल, असं म्हटल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे.

भुजबळांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश

शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे म्हणत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अश्या प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचं म्हणत नाशिक पोलिसांनी तातडीने तपास करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरून तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल, असं सांगितलं. मात्र, दोघांतली खडाजंगी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर भुजबळ यांच्याविरोधात आमदार कांदे यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण: राष्ट्रपती, पंतप्रधान यांची बदनामी केली तर चिंता करु नका, सामनातून केंद्राला टोला

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ वर, लोकल बंद करणे ‘हा’ शेवटचा पर्याय !

swarit