HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारांची संपर्क करण्याची कुणाची हिंमत नाही !

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा पुन्हा एकदा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत पुढे म्हटले की, “मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही गोड बातमी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वत: देतील, असे ते म्हणाले. १४५चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांचे स्वागत आहे. बहुमत असेल तर सरकार स्थापन करावा, असे आव्हान राऊतांनी आज (७ नोव्हेंबर) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपला केले आहे.

तसेच सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप राऊतांनी भाजपवर यावेळी केला आहे. “शिवसेनेचे आमदार फुटणार नाही, शिवसेनेच्या आमदारांची संपर्क करण्याची कुणाची हिंमत नाही,” असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त करत आमदारांच्या हॉटेलमधील मुक्कामावर राऊतांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेतदरम्यान राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कोणताही वैयक्तिक मतभेद नाही, असे विधान राऊत यावेळी केले आहे.

मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका मांडत असतो. शिवसेनेची भूमिका सांगण्यासाठी आज मातोश्रीवर बैठक बोलविण्यात आल्याचे राऊतांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि संघाचे सरसंघाचालक मनोहन भागव यांच्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे राऊतांनी पत्रकाराने सांगितले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कोणताही वैयक्तिक मतभेद नाही, असे विधान राऊत यावेळी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी ‘इथे’ येणार

News Desk

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी; खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk