HW News Marathi
देश / विदेश

वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही सर्वोच्च नागरी पुरस्कार, हे देशाचे दुर्दैव!

मुंबई। “साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले”, असे वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना रानौतनं केलं. या पार्श्वभूमीवर आज (१३ नोव्हेंबर) सामनाच्या अग्रलेखातून कंगना रानौतच्या विधानाचा या खरपूस समाचार घेतला आहे. “वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे”, अशा शब्दात टीका केली आहे.

एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. अभिनेत्री कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असे वक्तव्य कंगना रानौतने केले होते. कंगनाबेनच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाबेनला सरकारने नुकतेच ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे, असं सामनाच्या अग्रलेख म्हटले आहे.

“शिवसेनेने राष्ट्रवाद , हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात . महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो ; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू – गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे . कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ,” असे म्हहणालं

राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजे

कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचे नथुरामप्रेमही उफाळून येत असते. तिच्या बरळण्याकडे एरव्ही कोणी फारसे लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान ततोतंत खरे ठरते. 1947 साली स्वातंत्र्य मिळालेच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम झाला. हजारो नव्हे तर लाखो जणांनी त्याकामी बलिदान केले. तात्या टोपे, झाशीची राणी, वासुदेव बळवंत फडके, तीन चाफेकर बंधू, अश्फाक उलमा खाँ, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, सुखदेवांसारखे असंख्य वीर फासावर गेले. वीर सावरकर, टिळकांसारख्यांनी काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगल्या. घरादारांवर तुळशीपत्र ठेवले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रज साम्राज्यास आव्हान दिले. अंदमान, मंडालेचे तुरुंग कांतिकारकांनी भरून गेले. ‘चले जाव’चा नारा गांधीजींनी देताच मुंबईतील गिरणी कामगार रस्त्यावर उतरला व इंग्रजांना पळताभुई थोडी झाली. जालियनवाला बागसारखे हत्याकांड ब्रिटिशांनी घडवून स्वातंत्र्ययोद्धय़ांच्या रक्ताने न्हाऊन काढले. रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला ‘भीक’ असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस ‘पद्मश्री’ पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भिकेची उपमा देणाऱ्या कंगनाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, असे सामनात म्हटलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज – सामना  

News Desk

Republic Day | ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

News Desk