HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेवर हल्ले, राऊतांचा आरोप

मुंबई | “भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना वा इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत,” असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत आज (७ एप्रिल) दिल्लतून मुंबई दाखल झाले आहे. राऊतांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी तोढ-ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. विमानतळावर उतरल्यानंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “हे समर्थन किंवा शक्तप्रदर्शन नाही, ही शिवसेना आहे. ही लोकांच्या मनातील चिड आणि संताप आहे.”

राऊत म्हणाले, “हे समर्थन किंवा शक्तप्रदर्शन नाही, ही शिवसेना आहे. ही लोकांच्या मनातील चिड आणि संताप आहे. माझ्यासोबत विनायक राऊत आहे. आम्ही कालपासून चर्चा करत आहोत. आज आयएनएस विक्रांतचा जो घोटाळा आपल्या मराहारष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून  झाला आहे. आपण पाहिला असेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. ज्या पद्धतीने महाविकासआघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या खांद्यावर बंदुक ठेवून शिवसेनेवर वा इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. ही ना मर्दानी आहे. हे पाठीत खंजुर खूपसून राजकारण करण्यासारखे आहे. त्याविरोध हा उसळलेला आगडोंब आहे. मला वाटते ही सुरुवात आहे. एक ठिंगी पडलेली आहे. आणि या पुढे जस जसे त्यांची पावले पडतील, त्यानुसार आमची पावले पडतील, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. 

शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि खासकरून तुमच्याबद्दल सांगितले, या प्रश्नाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवार यांचे आभार मानले. माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैंनिकाविषय त्यांनी पंतप्रधानांशी जावून चर्चा केली. मी फक्त निमित्त आहे. महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्य राजकीय कार्यकर्त्यांवर मंत्री, आमदार आणि खासदारांवर जे भाजपचे विरोधक आहेत. त्यांच्यावर ज्याप्रकारे सुडाच्या कारवाया सुरू आहेत. पवारसाहेबांनी माझ्यानिमित्ताने पंतप्रधानांकडे आपली खंत व्यक्त केली आहे, असे मी मानतो. शिवसेनेची जी आक्रमकता आज दिसली ती पुढे देखील अशीच राहिल का?, राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भाजप राज्यातून जो आमच्यावर हल्ले करतो. ते फार काय करू शकतात. हे आम्ही आदिच सांगितले आहे. आम्हाला तुरुंगात पाठवले, तर आम्ही तयार आहे. आमच्यावर खुनी हल्ले करतील, आमची तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहेत. पण लक्ष्यात घ्या. यापुढील २५ वर्ष तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही. यांची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची खबर या महाराष्ट्रात खणली आहे. आणि ही खबर देशातसुद्धा खणली जाईल. जर आपण अशा प्रकारचे वर्तन ठेवले तर राजकीय विरोधक हा विचाराने सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून, सगळ्यांना उद्धवस्त करून पहात असाल. यात तुम्ही सुद्धा उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कालपासून आयएनएस विक्रांत या कोट्यावधीच्या घोटाळ्यावर बोलत आहोत. आणि भाजपचे प्रमुख लोक ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती. हे विक्रांत घोटाळा करणाऱ्याला जाब विचारत नाही. पण, आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्याच्या बाजुने उभे आहेत. हा निर्ल्लजपणाचा कळस आहे.” 

तिन्ही पक्ष संकट काळात एकत्र –  राऊत

पैसे कुठे गेले याचे सोमय्यांकडे उत्तर नाही, असे पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “त्यांच्याकडे उत्तर असू शकत नाही. कारण मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढले आहे. या विषयावर राज्यसभेत कामकाज बंद पडले आहे. याविषयावर त्यांच्या पक्षाचे खसदार याविषयावर बोलू शकत नव्हते. कारण त्यांनाही पटले की, हा भ्रष्टाचार झाला आहे. उत्तर देणार नाही कारण भ्रष्टाचार आणि घोटाळा झालेला नाही. देश भक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले. आणि ते पैसे निवडणुकीत वापरले. ते पैसे पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी कोट्याधी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग केली आहे. हे मी पुरावा आणि दाव्यासह सांगते. तिन्ही पक्ष संकट काळात एकत्र आहेत. संकट काळात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. ज्याला तुम्ही संकट म्हणतात ते आमच्यासाठी संधी आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २०० कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Aprna

केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करणार ! – नाना पटोले

Aprna

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk