HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

हवा को गुमान था, अपनी आज़ादी पर. किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया!

मुंबई | राज्यात निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेते सत्ता स्थापनचा संघर्ष पाहायला मिळाला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्रीवर होणार या भूमिकेवर शेवटपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ठाम राहिले होते. राऊत यांनी दररोज पत्रकार परिषद आणि ट्विटद्वार भाजपवर टीका केली जात होती. भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी भाजप नेत्यांनी राऊतांना जबाबदार धरले. मात्र, अखेर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. तरी देखील राऊत भाजपवर ट्वीट करत निशाणा साधल आहेत.

“हवा को गुमान था…अपनी आज़ादी पर…किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया ! …..जय महाराष्ट्र, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. राऊत यांनी आज (३ डिसेंबर) शायरीच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. राऊतांनी ट्वीट करताच २० मिनिटांतच त्यांचे हे ट्वीट दीड हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे. आणि जवळपास ३०० जणांनी रिट्विट केली आहे.

 

Related posts

राजीव गांधींनी जे केले नाही ते भाजपने करुन दाखविले

News Desk

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk