HW News Marathi
महाराष्ट्र

‘अंडे आणि कोंबडी’ला शाकाहारीचा दर्जा द्या | संजय राऊत

नवी दिल्ली | ‘अंडे आणि कोंबडी’ला शाकाहारीचा दर्जा द्या,’ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेत केली आहे. राऊत यांनी राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरू असताना ही मागणी केली आहे. आयुर्वेदाला फक्त जडीबुटीपर्यंत मर्यादित न राहता कामाय नये. अंडे, कोंबडी शाकाहारी आहे की मांसाहारी हे ठरवण्याची वेळही राऊत म्हणाले. यानंतर पुन्हा एकदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद बळकट करण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगत राऊत यांनी त्यांचे मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद बळकट करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत राऊत यांनी राज्यसभेत व्यक्त केले. अंडे शाकाहारी करण्याची मागणी करताना राऊत यांनी त्यांना आलेले अनुभव राज्यसभेत सांगितले.

राऊत म्‍हणाले की, “मी एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो असता, तिथल्‍या आदिवासी बांधवांनी मला जेवणाचे ताट आणून दिले. मी त्याला विचारले काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटले मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे. जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होण्‍याचा दावा त्याने केला. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. असे सांगत, आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे असे ते म्‍हणाले.

यासोबतच राऊत यांनी हरियाणामधील देखील एक उदाहरण दिले. राऊत म्‍हणाले की, “काही दिवसांपूर्वी माझ्याकडे हरियाणामधील काही लोक आले होते. त्‍यांनी आयुर्वेदीक अंड्‍याविषयी सांगितले. अंडे आयुर्वेदीक कसे काय, असा प्रशन मी त्‍यांना विचारला. याविषयी माहिती देताना हरियाणातील लोक म्‍हणाले की, आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो. या खाद्यामध्‍ये लवंग, मुसली, तीळ याचा समावेश असतो. हे खाणे खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदीक असल्‍याचा दावा या शेतकर्‍यांकडून करण्‍यात आला आहे. या सर्वांचा आधार देत अंडे मांसाहारी की शाकाहारीचा दर्जा द्यावा, याची दखल आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घ्‍यावी, अशी मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

News Desk

दाभोळकर हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

News Desk

“मी पोहोचलो रे हिमालयात”; महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

Manasi Devkar