HW News Marathi
महाराष्ट्र

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा झाल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट, चौकशी करण्याची मागणी

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात आरोप-प्रत्यरोप सुरू आहे. राऊतांनी आज (११ मे) ट्वीट करत एनएसईएल कोटी शेअर्सचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे.  राऊतांनी ट्वीट एनएसईएलमध्ये ५६०० कोटींचा घोटाळा केला असून त्यांची चौकशी करण्याची मागणी करत पुन्हा एकदा सोमय्यावर निशाणा साधला.

राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, “NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा चौकशीची मागणी किरीट सोमय्या ने केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. 2018 19 असे 2 वर्ष सोमय्या ने मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये त्याच्या युवक प्रतिष्ठान साठी घेतले!” राऊत हे गेल्या दिवसांपासून ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधत आहेत. 

याआधी राऊतांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे गोळा करून ५७ कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. २०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५७ कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला असून ही रक्कम सोमय्यांनी लाटली असंही त्यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हंटलेलं आहे. जनतेकडून गोळा केलेले पैसे सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केले नाहीत व हे पैसे त्यांनी आपल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरले, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी मुख्यमंत्री बनण्यास बिलकुल तयार नाही !

News Desk

डिजिटल जनगणनेत ओबीसींचीही जनगणना करा | छगन भुजबळ

News Desk

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk