HW News Marathi
महाराष्ट्र

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | “जनाब सेना म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा,” असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) राज्यातील शिवसेनेच्या १९ खासदारांशी संवाद साधला. यानंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

 “जे आम्हाला जनाब सेना म्हणतात, त्यांनी त्यांची भूतकाळातील कर्तबगारी तपासून पाहावी. काश्मीरच्या संदर्भात जे आम्हाला अक्कल शिकवत आहे. काश्मीरमध्ये अतिरेक्याशी हात मिळवणी करून सरकार स्थापन करणारी हीच भाजप होते. मेहबुबा मुफ्तसोबत कोणी सरकार स्थापन केले?, आम्ही तेव्हा ही ओरडत होतो की, हे पाकिस्तानवादी आणि फुटरतावादी आहेत. हे अतिरेकी अब्दुल गुरुशी हात मिळवणी करणारे आहेत. यांच्यासोबत सरकार स्थापन करून या काश्मीरमधील हुतात्मांचा, काश्मीर पंडितांचा यांचा अपमान करू नका हे सांगणारे आम्ही आहोत. तेव्हा भाजपने मेहबुबा मुफ्तीशी क्रांतीकारक हात मिळवणी करून देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा जनाब कोण आणि जनाब सेनेवाले खरे कोण?,  हे तुम्हला आणि महाराष्ट्रात जावून सांगू,” असे राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ नाही

राऊत म्हणाले, शिवसेनापक्ष प्रमुखांनी जोरदार मार्गदर्शन केले आहे. आम्ही सर्वजण १९ जिल्ह्यात जात आहोत. मी नागपुरला जात आहे. आणि इतर खासदार आपआपली टीम घेऊन त्यांच्या जिल्ह्यात जात आहे. चार दिवस जिल्ह्याचे वातावरण ढवळून काढायचे आहे. शिवसेनेविषयी जे गैरसमज पसरविले जात आहेत. भाजपकडून खास करून आमच्या बद्दल जे विष आणि जळफळाट बाहेर पडत आहेत. त्यांना उत्तर द्याचे आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. कसली जनाब सेना शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी सेना आहे. हिंदुत्ववादी होती आणि हिंदुत्ववादी राहिल. शिवसेनेच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झाली नाही ना आम्ही होऊ देणार नाही,” असे ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार

News Desk

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

News Desk

पाटण विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांचा शंभूराज देसाईंनी घेतला आढावा

Aprna