HW News Marathi
महाराष्ट्र

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारातून शिवसेनेने दिली उमेदवारी

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा अवघ्या काही तासात होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. यानंतर शिवेसना- भाजप त्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार शिवसेनेने त्यांच्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातून राजगकारणात एन्ट्री करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एबी फॉर्म देऊन नालासोपाऱ्यातून उमेदवारी दिला आहे.

प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या निश्चित झाले आहे. नालासोपारा परिसराचा न झालेला विकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे. उद्धव ठाकरे यांनी मला तेथे निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी निवडणूक लढवणार, असे म्हणाले होते.

प्रदीप शर्मा यांचा अल्प परिचय

१९८३ बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती. शर्मा यांनी प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत,१०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पोलीस सेवेत ते पुन्हा परतले.शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर ‘रेगे’ नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर”, रामदास आठवलेंचा नारायण राणेंना जाहीर पाठिंबा

News Desk

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करा, उदयनराजे भोसले यांचे आवाहन

News Desk

नरेंद्र मोदींना ‘मोदीभक्तांकडून’ अनौखी भेट!

News Desk