HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधी पक्षासारखे वागू नये, सरकार स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपची भूमिका

मुंबई: स्पष्ट बहुमत नसल्याने शिवसेनेची गरज आहे. त्यांच्या सल्ल्यानेच सरकारची वाटचाल सुरू रहाणार आहे; मात्र सरकारचा भाग असताना शिवसेनेने विरोधी पक्षासारखे वागू नये, अशी भूमिका भाजपने राज्य सरकारच्या तिसºया वर्धापन दिनानिमित्त स्पष्ट केली आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल स्वीकारून आपण शिवसेनेला बरोबर घेतले आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. त्यामुळे ते आपल्याबरोबर आहेत. आगामी २०१९ मधील निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेने बरोबर यायचे की वेगळे लढायचे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायचे असल्याचेही स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना जनतेपर्यंत सरकारने केलेली कामे पोचवण्याचे अभियान हाती घ्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. शेतकºयांना कर्जमाफीचा निर्णय, जलयुक्त शिवार कार्यक्रम, ‘आपले सरकार’ हा डिजिटल विषय या सरकारची उपलब्धी आहे. तो जनतेपर्यंत पोहोचवणे हे आगामी दोन वर्षांतील काम असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यात सुरू झालेले प्रकल्प पूर्ण करणे हेच आगामी दोन वर्षांतले आव्हान असेल. ते पूर्ण केले तरच जनता पुन्हा आपल्याला मतदान करेल असेही भाजपच्या प्रमुख नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तीन वर्षपूर्तीचा प्रचार कसा करावा, मतदारांपर्यंत कोणती माहिती पोचवावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे प्रमुख नेते व प्रमुख कार्यकर्त्यांशी नुकताच संवाद साधला. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत निवडणुकीत विजय मिळत असला तरी सोशल मीडियात सरकारची चांगली प्रतिमा उमटत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच आता घराघरात जाऊन सरकारचे काम पोचवावे, असे पक्षाने ठरवले आहे. यासंदर्भात पक्ष लवकरच मोहीम हाती घेणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे ठाकरे सरकार नाही तर राष्ट्रवादीचं सरकार”, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

News Desk

संग्रामपूर शहर विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करा! – बच्चू कडू

Aprna

कोरेगाव-भीमा प्रकरणी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात

Aprna