HW News Marathi
महाराष्ट्र

यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी संपली

मुंबई | शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेला आयकर विभागाची चौकशी आज अखेर संपली. जाधव यांच्या घरी शुक्रवारीपासून (१८ फेब्रुवारी) सुरू असलेली चौकशी आज (२८ फेब्रुवारी) सलग चार दिवसांपासून आयकर विभाग चौकशी करत होती. आतापर्यंत ३३ कोटी रक्कमेची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केले आहेत. केंद्र सरकारकडून केलेली कारवाईही सूड बुद्धतीने केली कारवाईचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. 

जाधव यांच्या मुंबईतील माझगावमधील घरी शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी आयकर विभागाचे अधिकारी यांच्यासह सीआरपीएफचे जवान दाखल झाले होते. जाधव यांची पत्नी यामिनी जाधव या मुंबई भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. जाधवांवर बेनामी कंपन्यांच्या मदतीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. जाधवांवर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून यूएईला नेहण्याचा बोलले जात आहे. आयकर विभागाने काही दिवसापूर्वी जाधवांना नोटीस पाठवली होती. परंतु, त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता शरद पवार अन् अजित पवार येतील कि काय ?

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

शरद पवारांनी फोनवरून नारायण राणेंना दिल्या शुभेच्छा!

News Desk