HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

मुंबई। शिवसेनेची विश्वासार्हताच संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपुष्टात येऊ पाहत होती. अशा वेळेला श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराजांची भेट घेणे हे आपल्या विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शिवसेनेने काढलेला मार्ग आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२९ मे) न्यू पॅलेसला भेट देऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महाराजांची भेट घेऊन दर्शन घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शाहू महाराजांशी संवाद साधल्याचे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप केला होता. तसेच छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना खडे बोल सुनावताना उमेदवारी नाकारली म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान कसा होऊ शकतो? अशी विचारणा काल केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज न्यू पॅलेसला जात शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

राजेंना उमेदवारी नाकारण्यावरून सुरू असलेल्या चर्चेवरून शाहू महाराज यांनी काल भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, आमच्यामध्ये काही विचारविनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसे काही झाले नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. घराण्याचा नव्हे म्हणजे मला विचारलेले नाही किंवा माझी समंती घेऊन पावले उचलली असे झाले नाही, असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले होते. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांचे अचानक प्रसिद्धी माध्यमांसमोर येणे आणि ही भूमिका मांडणे म्हणजे अनाकलनीय आहे.

कारण ते प्रसारमाध्यमांपासून लांब असतात मग यामागे बोलवता धनी कोण असावा? अशा प्रकारच्या राजकीय घरफोड्या या राज्यात कोण करते, हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. छत्रपतींचे घर तरी यातून सुटले पाहिजे होते.

परंतु छत्रपतींचे घर, छत्रपतींचा सन्मान यापेक्षा आम्हाला राजकारण मोठे वाटते. एक तर राजेंना उमेदवारी देण्यात त्यांचा अवमान केला.आणि छत्रपतींच्या घरात आपल्या राजकारणासाठी वाद निर्माण केला. छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणे हा शिवसेनेचा डॅमेज कंट्रोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. कितीही झाले तरी छत्रपतींना मानणारा हा महाराष्ट्र आहे. श्रद्धाळू महाराष्ट्र आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या संबंधित जे काही राष्ट्रवादी- शिवसेनेच्या संगनमताने झाले ते महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. शिवप्रेमींना आवडलेले नाही.

खासकरून मराठा समाजमद्धे एक प्रचंड असंतोष छत्रपतींच्या अशा प्रकारच्या अवमानामुळे निर्माण झालेला आहे.मराठा समाजाचा हा संताप सावरण्यासाठी कोल्हापुरात जाणे शाहू महाराजांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे करून देणे हा त्यांचा खटाटोप आहे. छत्रपतींचा अवमान करण्याचा अधिकार संजय राऊत याना कोणी दिला. तुम्ही उमेदवारी दिली नाही पण मावळे असतात म्हणून राजे असतात हे भाजपने दाखवून दिले होते. राष्ट्रपती कोट्यातून सहा वर्षासाठी सन्मानाने छत्रपतींना खासदारकी दिली होती. भाजपचा प्रचार कुठे करायला सांगितले नाही, झेंडा खांद्यावर घ्यायला सांगितले नाही. चौकटीत बसवून काम करवून घेणे हा त्या गादीचा अपमान होऊ शकतो. म्हणून आमचा तो विषयच नव्हता. छत्रपती संभाजीराजे यांनी फडणवीस साहेबाना भेटण्याच्या अगोदरच मी अपक्ष निवडणूक लढणार, मला सर्वांनी समर्थन द्यावे, असे जाहीर केले होते. मग खेळी किंवा डाव जर कोणाचा असेल तर पवार साहेबानी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली होती. पवार साहेबानी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली याचा अर्थ शिवसेना आणि काँग्रेसचे समर्थन असेल तरच हे होऊ शकते करण महाविकास आघाडीचे ते प्रमुख आहेत.

मग दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांचे वक्तव्य येणे म्हणजे संजय राऊत शिवसेनेचे नेते असले तरी राष्ट्रवादीचे, पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत, असे दरेकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने बोलणार – अनिल परब

News Desk

पुणे मेट्रोची २ स्थानके दिसणार पुणेरी पगडीच्या आकारात

News Desk

स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा!

News Desk