HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावतीत शिवसेनेचा थेट एमआयएमला पाठिंबा, नव्या राजकीय भूमिकेमुळे मोठी टीका

अमरावती | अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या राजकीय भूमिकेमुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने एमआयएमला प्रत्यक्ष तर मायावती यांच्या बसपने एमआयएमला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या राजकीय भूमिकेमागे नेमकी रणनीती काय ? याबाबत सध्या शहरात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिरीष रासने यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या रासने यांना या निवडणुकीत ९ तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना ६ मते मिळाली. मात्र, याच निवडणुकीत शिवसेनेने थेट एमआयएमला पाठिंबा दिला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागत आहे.

भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. “स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने एमआयएम सोबत युती केली असून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिला आहे”, असा दावा शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच “शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेले हिंदुत्व शिवसेनेने सत्तेच्या लाचारीसाठी सोडले आहे. अमरावतीत पुन्हा याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी वाहिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली

News Desk

राजभवनातून फाईल गहाळ, शिवसैनिकांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

News Desk

CMO अकाऊंटच्या ‘त्या’ ट्विटबद्दल शहानिशा करु – अजित पवार

News Desk