HW News Marathi
देश / विदेश

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क !

मुंबई | लोकसभेत शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. लोकसभेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचे राऊत म्हणाले आहे. दोन्ही सभागृहात सेनेचे २१ खासदार असून शिवसेनेच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना लोकसभेच्या उपाध्यक्षपद देण्याची इच्छा राऊतांनी व्यक्त केली आहे.

राऊत यांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे नाव सुचविले आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे. लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु शिवसेनेच्या दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना एकमेव मंत्रिपद वाटेला आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण | पंतप्रधान  मोदी

Gauri Tilekar

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविला

Aprna

कृषी विधेयकावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं चित्र संसदेत दिसलं, सामनातून केंद्रावर टीका

News Desk