HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेसोबत शिवसेनेचे ‘हे’ १० आमदार आज घेणार शपथ

मुंबई | बहुप्रतीक्षित महाविकासआघाडीच्या सरकारचा पहिल्या मंत्रिमंडळाचा आज होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतल्यानंतर तब्बल एक महिन्याने महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (३०डिसेंबर) दुपारी १ वाजता विधानमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. यात युवा नेते आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहे. ठाकरे सरकारमध्ये जेष्ठ आणि तरुण नेत्यांचे ताळमेळ असे मंत्रिमंडळ असणार आहे. तसेत आदित्य ठाकरेसह अॅड अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह १३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट १० आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे.

शिवसेनेचे हे नेते घेणार शपथ

  • अॅड अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
  • उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) – कोकण
  • संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) – विदर्भ
  • गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) – उत्तर महाराष्ट्र
  • दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) – उत्तर महाराष्ट्र
  • अब्दुल सत्तार – सिल्लोड (औरंगाबाद) – मराठवाडा
  • डॉ. संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) – मराठवाडा
  • शंभूराजे देसाई – पाटण (सातारा) – पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या आमदार मिळणार संधी

  • बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
  • शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
  • राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेच्या दोन नेत्यांनी घेतली शपथ

  • एकनाथ शिंदे (१०) – गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  • सुभाष देसाई (१२) – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीडितेच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना स्वीकारणार – एकनाथ शिंदे

News Desk

आमदार शिवाजी कर्डिलेच्या पोलीस कोठडीत वाढ

News Desk

शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी सेल्फी निर्णयाला तूर्तास स्थगिती -शालेय शिक्षणमंत्री तावडे

News Desk