नागपूर । “कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, हे आता महाराष्ट्रात होऊ देणार नाही,” असा इशारा शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला. हिवाळा अधिवेशनात पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. आदित्य ठाकरे म्हणाले, “सत्तेची हावे कशी असते आणि मित्रांना कसे डावलले जाते हेही मी पाहिले आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे एवढे नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नाही. आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भयमुक्त सरकार स्थापन झाले आहे.”
Shiv Sena's Aaditya Thackeray in Maharashtra Assembly: As they say, 'keechad hoga to hi kamal khilega', I want to tell them that the days for 'keechad' are over and their intentions will not bear fruits now. (18.12.2019) pic.twitter.com/4iE1xTg74A
— ANI (@ANI) December 19, 2019
आदित्य ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले, “महाविकासआघाडीचे सरकार हे वचनपूर्ती करणारे सरकार आहे. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असला, तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय आहे.” पर्यावरणात होणाऱ्या बदलाचा शेतीवर होणारा परिणाम यावरही विशेष चर्चा घेण्याची मागणी केली. या भाषणात त्यांनी भाजपवर शांतपणे शेलक्या शब्दात ताशेरे देखील ओढले. ‘सामना’वरुन झालेल्या गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले की, अगोदरच सामना वाचला असता तर ते आमच्यासोबत या ठिकाणी असते.
यावेळी ठाकरेंनी नोटबंदीच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र, “आमचे सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजिटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावs लागेल,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.