HW News Marathi
महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला सुरुवात

पुणे | महाविकास आघाडीच्या शिवभोजन योजनेचा श्रीगणेशा अखेर आज प्रजासत्ताक दिनी सुरु झाला. या उपक्रमाची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली. ही योजना सुरु करण्याचा मुख्य हेतू हा गरजू लोकांना कमी पैशात जेवणाचा लाभ घेता यावा यासाठी होता त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनानंतर नागरिकांना केले. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या उद्घाटनानंतरं पहिली थाळी लाभार्थ्यांना दिली. या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ होते. मात्र, या थाळीचे शहरात आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर ठेवण्यात आले आहेत. शहरी भागात ही थाळी १५ रुपयांनी कमी ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. मुंबई उपनगरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या उपहारात ही १० रुपयांत मिळणाऱ्या थाळीचे उद्घाटन करण्यात आले. पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त दरात आणि ते देखील दर्जेदार जेवण असलेली थाळी मिळावी हाच या योजनेमागील उद्देश असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

News Desk

पुण्यातील निर्बंधांबाबत अमृता फडणवीस संतापल्या….!

News Desk

लॉकडाऊनचे योग्य नियोजन नाही, सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका

News Desk