HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा दिला राजीनामा

सातारा | शिवेंद्रराजे भोसले यांनी आज (३० जुलै) सकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला आहे. यामुळे शिवेंद्रराजे भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई येथील गरवारे क्लबमध्ये उद्या (३१ जुलै) शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साताऱ्यातील इच्छुकांच्या मुलाखतीकडे त्यांनी पाठ फिरवल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. राजे पक्षसोडून जाणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले होते. परंतु शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी केले होते. मात्र वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

शिवेंद्रराजे यांनी रविवारी (२८ जुलै) त्यांच्या सुरूची या निवासस्थानावर नगर विकास आघाडीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्वांनी राजेंना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह केला होता. यानंतर राजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बोलून भाजप प्रवेश निश्चित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये तहसीलच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात काँग्रेस आयचे परळी तहसीलदार कार्यलायसमोर ठिय्या आंदोलन

Aprna

बारामतीमध्ये कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

News Desk

माझ्या भाषणाचा विपर्यास झाला! प्रसाद लाड यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk