HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा सुरू

पुणे | शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडत आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण तर शिवयोग या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील आज होणार आहे. दरम्यान, शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त पोलिसांनीही सलामी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर ढोल आणि लेझिमच्या पारंपारिक खेळाला सुरुवात झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

Aprna

मराठा आरक्षण- सर्वोच न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार 

News Desk