HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद रिक्त गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.

गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद‌ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता होती. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही राबवावे – अजित पवार

News Desk

शरद पवारांचा जबरा फॅन, पाठीवर गोंदवला पर्मनंट टॅटू

News Desk

ठाकरे सरकार घोटाळेबाज मुश्रीफांना पुन्हा वाचवणार का ? कोल्हापूर दौऱ्यावरुन सोमय्यांचे आव्हान

News Desk