HW News Marathi
Covid-19

बीड जिल्ह्यात असा साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन !

बीड । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवस्वराज्य दिनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी माझ्या हस्ते उभारणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी राजा म्हणून इतिहासातील कर्तृत्व पिढ्यानपिढ्या साठी मार्गदर्शक असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले.

आज शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून कोरोना आपत्तीच्या काळात कोड कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्धा अंगणवाडी सेविका यांच्या वारसांना ५० लाख रुपयांच्या अनुदानाचा धनादेश पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मृतांचे वारस सचिन बाबासाहेब हजारे तसेच राजेंद्र रघुनाथ तांदळे यांनी हे धनादेश स्वीकारले.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतुन घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व घराची प्रतिकात्मक चावीचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील घरकुल लाभार्थी जानकाबाई नवले पाली तालुका जिल्हा बीड, आणि रमाई आवास योजना ग्रामीण चे घरकुल लाभार्थी श्री बाबासाहेब मुकुंदा जाधव यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.

कोरोना कालावधीत जिल्ह्यातील बचत गटांनी मास्क निर्मिती करून चांगले कार्य केल्याबद्दल सिमरन महिला बचत गट बीड आणि श्री साई महिला बचत गट घाटसावळी यांच्या सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 11 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स संच पालकमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

News Desk

देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या घटली!

News Desk

‘महाराष्ट्र बचाव’ भाजपच्या आंदोलनाला ट्वीटवर ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ ट्रेडिंगने प्रतिउत्तर

News Desk