पाटण | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागत आहे. याच निकालाची धूम आज राजकीय वर्तुळात पसरली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकताना दिसत आहे. तर जिथे गेली अनेक वर्ष भाजपची सत्ता होती तिथे सेना राष्ट्रवादी आपली सत्ता स्थापन करताना दिसत आहे. पाटणमध्ये शिवसेना नेते शंभूराज देसाई हे आघाडीवर असून राष्ट्रवादीचे पाटणकर पिछाडीवर आहेत.
तर दुसरीकडे औरंगाबाद येथे लासूर स्टेशन ग्रामपंचायतवर आमदार प्रशांत बंब यांचं पॅनल विजयी, सलग पाचव्यांदा प्रशांत बंब यांनी मिळवला विजय, 17 पैकी 16 सदस्य प्रशांत बंब गटाचे विजयी, सलग पाचव्यांदा प्रशांत बंब गटाने मिळवला विजय, गेल्या 20 वर्षणापासून लासुर ग्रामपंचायत प्रशांत बंब यांच्या ताब्यात होता.