HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा’ निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोप !

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद विकोपाला गेल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत अशीच एक संतापजनक घटना समोर आणली आहे. एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.तसेच, भाजपकडून हे शिवसेनेने केल्याचा आरोप केला जात आहे.

व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्ड वरून झालेल्या वादातून एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सऍप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. असे फडणवीस म्हणाले आहेत.

 

याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे प्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

News Desk

पाच महिन्यांत १९ हजार ५५३ तरूणी, महिला बेपत्ता

Sanjay Jog

नोकरी नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk