HW News Marathi
देश / विदेश

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपचा सेनेला सवाल

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.दरम्यान, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

कंगनाचे समर्थन करताना विज यांनी आज (५ सप्टेंबर) शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. ते म्हणाले, “मुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? का त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो. जे अशा प्रकारच्या धमक्या देतात त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण कुणालाही सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पाकिस्तानचा मोठा कट उधळला!’

News Desk

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, १५ दिवसातील ही तिसरी भेट!

News Desk

शरद पवारसाहेब सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय ? राष्ट्रवादीचा भाजपला सवाल

Gauri Tilekar