HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर रणजितसिंह देशमुख धनुष्यबाण सोडत पुन्हा कॉंग्रेसचा हात हातात घेणार!

सातारा | माण- खटाव या दुष्काळी तालुक्यात सहकारी कृषी उद्योगांची उभारणी करून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गांधी भवन या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००७ साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामं करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची मुळे घट्ट केली होती. २००३ साली आलेल्या दुष्काळात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे संयोजनही त्यांनी केले होते. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे देखील युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठीच्या सिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. प्रसंगी कृष्णा खोरे कार्यालयावर तीव्र जनआंदोलन उभारून उरमोडी आणि जिहे कठापूर या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष केला.

याच भागात सहकारी उद्योगांची यशस्वीपणे उभारणी करणारे रणजित देशमुख औद्योगिक क्रांतीचे पहिले आयडाँल नेते ठरले. त्यामुळेच कायम दुष्काळी माणदेशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून देशमुख लोकांच्या पसंतीस उतरले.तसेच, अनेक कल्पनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा देणारे रणजितसिंह देशमुख यांची कल्पकता राज्याला दिशादर्शक ठरत आहे. तसेच, दुध उत्पादकांसाठीही त्यांनी कामे केली आहेत.

इतकंच नाही तर देशमुख यांनी फिनीक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण करून वृक्ष लागवड कार्यक्रमही राबवला. तसेच महिला व युवकांना स्वंयम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं आदि उपक्रम सुरू केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? कॉल रेकॉर्डची चौकशी करा, मोहित भारतीयांची मागणी

News Desk

कोल्हापूर, सोलापूर, जळगावकरांसाठीही लवकरच विमानसेवा!

News Desk

“राज्यपालांच्या दौऱ्यामुळं पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही”- प्रविण दरेकर

News Desk