HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…; संजय राठोडांनी सोडलं मौन

वाशिम | पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचं बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केले जातेय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या प्रकरणावरुन गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनामी करु नका, असं आवाहन शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास, मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा. सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली 30वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका, असं संजय राठोड म्हणाले.

संजय राठोड पुढे म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं.

“प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं यामधून जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यात कोणतंही तथ्य नाही. याची चौकशी मुख्यमंत्र्य्यांनी लावली आहे. त्या माध्यमातून पोलीस तपास करत असून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण गेल्या १० दिवसांपासून समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमांमधून बदनामी आणि घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करत असून माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका,” अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.

“मी १४ नाही तर १० दिवस घरी होतो. यावेळी माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम मी करत होते. मुंबईमधील फ्लॅटमधून शासकीय कामकाजदेखील सुरु होतं. यापुढेही कामकाज सुरु राहील. जे काही सत्य असेल ते चौकशीत बाहेर येईल,” असं संजय राठोड म्हणाले आहेत.

Related posts

सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

News Desk

दापोली-खेड मार्गावर मॅक्झिमो गाडीची डंपरला धडक, ५ जणांचा मृत्यू

News Desk

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk