HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; एकनाथ खडसे गटाकडून शिवसेनेला हादरा

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे गटाला शिवसेनेने शुक्रवारी हादरा दिला. जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीमधील ११ नगरसेवक आणि मुक्ताईनगर नगरपंचायतीतील एक अशा १२ नगरेसवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवकांचा यात समावेश असून यातील बहुतांश नगरसेवक खडसे समर्थक होते. या घडामोडीने खडसे आणि भाजपला मोठा धक्का बसला असताना काही तासांतच खडसे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे.

हातावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जळगाव जिल्ह्यात राजकीय रस्सीखेच सुरूच असून शिवसेनेने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक फोडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला मोठा झटका दिला. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी आज हातावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घेतला.चोपड्याचे माजी आमदार कैलास गोरख पाटील यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कैलास पाटील यांनी सरपंच ते आमदार असा प्रवास केला. शिवसेनेत आधी तालुकाप्रमुख आणि नंतर जिल्हाप्रमुख अशी पदे त्यांना मिळाली. त्या पदांवर त्यांनी नेटाने काम केले.

शिवसेनेचे जळगावमधील चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटील आणि शिवसेना महिला आघाडीच्या इंदिरा पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आणखी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून एकनाथ खडसे सक्रिय झाल्याने जळगावमध्ये येत्या काळात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील रस्सीखेच आणखीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे उसने देतो पण… रोहीत पवारांचा मोदींना टोला

News Desk

सचिन वाझेंचें सहकारी रियाज काझी यांना NIAकडून अटक

News Desk

लोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट ! सचिन सावंत

News Desk