HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकात पाटलांवर भाजपमध्ये अन्याय! दादा शिवसेनेत या,कोणी दिली ॲाफर ?

पुणे | विदर्भावर अन्याय होत असल्याची टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात अनेकवेळा केली आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने पण चांगलेच प्रत्युत्तर शिवसेनेचे मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी दिले आहे. विदर्भावर अन्यायाची भाषा करताना संपूर्ण अधिवेशनात पश्‍चिम महाराष्ट्रातील आमच्या चंद्रकांत दादांना एकदाही बाोलण्याची संधी दिली नाही हा पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय नाही का असा प्रश्‍न करीत चंद्रकांतदादा तुम्ही आमच्याकडे या, असे खुले निमंत्रण आमदार लांडे यांनी दिल्याने काही काळ सभागृहात हशा पिकला होता.

अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान तसेच गेल्या आठ दिवसात विदर्भावरील अन्यायाच्या अनेक गोष्टी मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलून दाखविल्या होत्या.त्याचा संदर्भ देत आपल्या भाषणात आमदार लांडे यांनी चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. विदर्भावर अन्यायाची भाषा वारंवार करण्यात येत आहे. मुनगंटीवार तसा वारंवार उल्लेख करीत आहेत. मात्र, असा उल्लेख करताना पश्‍चिम महाराष्ट्रातील आमच्या चंद्रकांत पाटील यांना सभागृहात बोलण्याची संधीदेखील दिली जात नाही. हा तर पश्‍चिम महाराष्ट्रावरील अन्याय आहे. त्यामुळे अशा पक्षात न राहता दादा तुम्ही आमच्याकडे या असे निमंत्रणच आमदार लांडे यांनी पाटील यांनी दिले आहे. मात्र, आमदार लांडे यांच्या या निमंत्रणाने सभागृहात एकच हशा पिकला होता.

भाजपच्या धोरणाप्रमाणे सभागृहात चंद्रकांत पाटील फारसे बोलत नाहीत. सभागृहात बोलण्याची मुख्य जबाबदारी ही मुनगंटीवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सर्वच दिवशी विविध मुद्दयावरून प्रामुख्याने हे दोनच नेते बोलत असतात. काल संपलेल्या अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्दयावर सरकारला चांगलेच कोंडीत पकडल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आधिकारी सचिन वाझे असो वा वीज बिलाचा विषय फडणवीस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला दोन पावले माघार घ्यावी लागली. या पाश्‍र्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना बोलण्याची संधी फारशी मिळालीच नाही. पाटील यांच्या या शांत राहण्याच्या भूमिकेचा फायदा घेत शिवसेनेचे आमदार लांडे यांनी मुगंटीवार व भाजपावर निशाना साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका –  आरटीओ नांदेड 

News Desk

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

काँग्रेसमुळे देशात लोकशाही टिकून राहिली | नाना पाटेकर

News Desk