HW News Marathi
महाराष्ट्र

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

जालना। कोरोनाचं थैमान थांबत नाही, आणि परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोवरच आता कोरोनाच्या नव्या विषाणूची अर्थात ओमिक्रोनची भीती व्यक्त केली जात असताना आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या मुद्द्यावर थेट भाष्य केल आहे. अजून आपल्या राज्याला ओमिक्रोनची कुठलीच भीती नाही, कारण कुठल्याही भागात लागण झाल्याचे दिसत नाही. आज त्याची चिंता बाळगण्याची गरज नसली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. शाळा ही एक डिसेंबरला ठरल्याप्रमाणेच सुरू होतील असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता जाहीर केले आहे.

सर्जिकल मास्क वापरा

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत झालेल्या या चर्चेतून आरोग्य विभागाचे अधिकारी, टास्क फोर्सचे अधिकारी, राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी यांची या विषयी दोन तासांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यात

नवीन व्हेरीयंट बाबत माहिती दिली. त्याचे स्वरूप काय, त्याच्या संसर्गाची गती पाचपट आहे, त्याची म्युटेशन जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना याचा अभ्यास करते आहे की त्याची दाहकता किती आहे, अशा अनेक बाबी आहेत या सर्वांचा अभ्यास चालू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले असून कापडी मास्क वापरण्यापेक्षा सर्जिकल मास्क वापरा अशी माहिती या बैठकीनंतर सांगण्यात आली आहे.

प्रवाशांना विमानतळावर क्वारांटाईन करायला पाहिजे

राजेश टोपे पुढे बोलताना असं म्हणालेत की यासाठी लॉकडाऊनबद्दल अद्याप बोलणं झालं नसलं तरी जे काही १३ देशांची यादी तयार करण्यात आली आहे जिथून संसर्ग येण्याची शक्यता आहे, तिथून येणार्‍या प्रवाशांना विमानतळावर क्वारांटाईन करायला पाहिजे, याशिवाय मुंबई पुणे नागपूर अशा इंटरनॅशनल एअरपोर्ट वर येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात यावी, विमान प्रवासाच्या ४८ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असावी अशा सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

या सर्व गोष्टीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची, जनजागृती करण्याची व लसीकरणाचा वेग वाढवायचा यावरही जोर देण्यात आला. दोन डोस कुठल्याही परिस्थितीत झाले पाहिजे असा आग्रह आहे. जे काही शर्थीचे प्रयत्न करता येतील ते करून लसीकरणाची गती वाढवायची ठरविण्यात आल आहे असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला संकटात आणण्याचा प्रयत्न सुरु, राऊतांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पलटवार  

News Desk

राऊत- फडणवीस यांच्या भेटीला राजकीय अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया

News Desk

“पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येणार”, राजू शेट्टींचं सूचक विधान

News Desk