HW News Marathi
Covid-19

मांसाहार करा म्हणणाऱ्या संजय गायकवाडांनी कोव्हिड रुग्णांना दिली चिकन बिर्याणी आणि अंडी

बुलडाणा | कोरोना रूग्ण संख्या वाढत असली तरी दूसरीकडे राजकारणात या विषयावरून गोंधळ सुरू आहेच. काही दिवसांपूर्वी मांसाहार करा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे वाटप केले आहे. रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा डायट प्लॅन असल्याचं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांनी त्याप्रमाणे स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन-बिर्याणी तसेच उकडलेल्या अंड्यांच्या आहाराचे वाटप केले आहे.

संजय गायकवाड यांनी मागितली माफी

मांसाहार खा म्हणणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांत्या प्रती दिलगिरी व्यक्त केली. ज्यांची मन दुखावली अशा व्यक्तींची दिलगिरी केली आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केले त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंचा कोरोनावरील ‘फॅबीफ्लू’ औषधाला आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी

News Desk

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk