HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेनं केलं स्वागत!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची आज (११ जून) सिल्वर ओकवर भेट झाली. यांच्या या यांच्या भेटीचं शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलंय. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात २ तासांच्या वर बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले आहे. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केला. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलं, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण

राजकीय वर्तृळात कधी काय फासे पलटतील याचा नेम नाही. अशात गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटी अनेक नेते मंडळी घेत आहेत. अशात आज (११ जून) शरद पवार यांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असून प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज पुण्यात ते बोलत होते.

राजकीय रणनीती आखण्याचं काम प्रशांत किशोर यांनी सोडलं

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे भगिनींचे समर्थक पंकजा मुंडेंच्या भेटीला, काय होणार बैठकीत?

News Desk

किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

News Desk

मुख्यमंत्री फडणवीस सर्वात बालीश: शरद पवार

News Desk