HW News Marathi
महाराष्ट्र

‘कुछ तो गडबड है’अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची बोलकी प्रतिक्रिया !

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपये खंडणीचे गंभीर आरोप झाल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे.अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्यांचे घर,कार्यालये अशा एकूण १० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.या सगळ्या प्रकरणात राजकीय दबावापोटी गोष्टी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडुन होतोय तर सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने होत असल्याचं भाजपकडुन सांगण्यात येतयं.

या सगळ्या प्रकरणावर संजय राऊतांनी एक अत्यंत बोलकी फेसबुक पोस्ट केली आहे. त्याच्या मते या सगळ्या प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड आहे. फेसबुक पोस्ट मध्ये संजय राऊत म्हणतात, कुछ तो गडबड है…

मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.

अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय.आर… वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.

दया ..कुछ तो गडबड जरूर है…

अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवर काय म्हणाले संजय राऊत

अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज प्रसारमाध्यमांशी तो बातचीत करत होते. सीबीआयला हायकोर्टाने काही सूचना केल्या आहेत त्यानुसार सीबीआय काम करत असेल असं मला वाटतं. यामध्ये राजकीय सुडबद्धीचा प्रकार नसावा, असं मतही यावेळी संजय राऊत यांनी मांडले आहे.

सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आबा आपल्याला लवकर सोडून गेले…”,आबांच्या आठवणीत अजित पवार झाले हळवे  

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

News Desk

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा; पंकजा मुंडेंची मागणी

Aprna