HW News Marathi
महाराष्ट्र

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’, सेनेचा भाजपवर हल्ला बोल

मुंबई। भाजप पक्ष हा शिवसेनेवर कायम टीका करत असतं. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संतापलेल्या शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच; असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर अशा शब्दांत शिवसेनेने जाहीर आव्हान दिलं आहे.

भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला

प्रसाद लाड यांच्या वक्तकव्यावरून आता राजकारण चांगलाच पेटलेलं दिसत आहे. “महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“शिवसेना भवन फोडू अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले होते ?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील

News Desk

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येणार? जयश्री पाटील उतरल्या मैदानात!

News Desk

आज मुंबईचा ‘शहरीबाबू’ शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल!

News Desk