HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खाल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केल्यानंतर सामनातून त्यांची पाठराखण

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिने ड्रग्स बाबतीत अनेक गोष्टी उघड केल्या नावाची यादी देऊ असे म्हटले होते. तिला राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी चांगलेच फटकारले होते.’सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. ‘सब घोडे बारा टके’ असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, ‘ असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याची पाठराखण करण्यात आली आहे. हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. ‘‘ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.’’ जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.’ असं म्हणत सेनेने पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे.

‘सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे.’

Related posts

तुमच्याकडे लायक उमेदवार नाहीत का ? रोहित पवारांची भाजप-सेनेवर टीका

News Desk

#MarathaReservation : मुख्यमंत्र्यांकडून एटीआर सादर, दुपारनंतर चर्चा

News Desk

वीज बिल आता सरासरीने देणार, उर्जामंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

rasika shinde