HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा’, महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेनेची गुजराती बांधवांना साद

मुंबई | सध्या राजकारणात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुक, पालिका निवडणुक यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधीपक्ष भाजप जोरदार तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईच्या दृष्टीने महत्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक २०२२ ला होणार आहे. आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेल्या या निवडणुकीसाठी सेना सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव जपला. मुंबई महानगरपालिकेवरील सेनेचा भगवा झेंडा खाली उतरवण्याच्या मार्गावर भाजप आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी १० जानेवारीला गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या नव्या पावलावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आदित्य ठाकरेंचे ‘केम छो वरळी’

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे बॅनर्सही चर्चेचा विषय ठरला होता. आदित्य यांची वरळीतून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘केम छो वरळी’ असे गुजरातीतून पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेनेला हे पोस्टर्स हटवावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा युटन

Aprna

 डिएसकेंची मालमत्ता होणार जप्त, सरकारचा आदेश

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे

News Desk