HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी अंतिम सुनावणी

मुंबई | मराठा आरक्षण वैध की अवैध यावर येत्या गुरुवारी (२७ जून) अंतिम निकाल मुंबई उच्च न्यायालय देणार आहे. राज्यात नोकरी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेशात १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात व समर्थनात केलेल्या जनहित याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून जवळपास दररोज अंतिम सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवला होता.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या, तर वैभव कदम, अजिनाथ कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यासह अनेकांनी कायद्याच्या समर्थनार्थ याचिका केल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच! –  अजित पवार

News Desk

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk