HW News Marathi
महाराष्ट्र

मी नीतिमत्ता गहाण ठेऊन राजकारण करणार नाही !

मुंबई | “राजकारण हे राजकारणासारखेच करायला हवे. नीतिमत्ता गहाण ठेऊन मी राजकारण करणार नाही. तेवढे तारतम्य मी नक्की बाळगणार. मात्र, पक्षवाढीसाठी मला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते प्रयत्न केल्याशिवाय मी राहणार नाही”, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज (२५ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशादरम्यान पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चांवर देखील भाष्य केले आहे. “आधी आताचे पाहू, नंतरचे नंतर पाहू”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत वाढलेल्या इनकमिंग संदर्भात प्रश्न विचारला असता, “मी नीतिमत्ता गहाण ठेऊन राजकारण करणार नाही. तेवढे तारतम्य मी नक्की बाळगणार. मात्र, पक्षवाढीसाठी मला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते प्रयत्न केल्याशिवाय मी राहणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्र्यांच्या घरावरील छापेमारीवर आजी गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

News Desk

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

News Desk