HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार

मुंबई | विधानपरिषदेच्या ६ जागेवर २१ मे रोजी निवडणुका होणार आहेत. २०१९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही, याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले. पण, विधानपरिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे घोषणा केल्यानंतर शिवसेनेने पहिल्यांदा त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

यानंतर भाजप कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडे, कोकणमधून राजीव साबळे या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप त्यांचे कोणते उमेदवार उभे करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

विधानपरिषदेत कोणत्या आमदाराचा कार्यकाळ संपणार

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
  • काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातून-बीड)
  • भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)
  • भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चार आमदारांचे राजीनामे स्वीकारले

News Desk

बारामतीत १ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात संख्या २०४ वर पोहोचली

swarit

गावगुंडाशी संबंध जोडून भाजपवाले पंतप्रधानांना बदनाम करत आहेत – पटोले

News Desk