HW News Marathi
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक शिवसेना आघाडी सरकारसोबत एकत्र लढणार 

मुंबई | राज्यात येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत या निवडणुका स्वतंत्रपणे नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहे.

“आगामी काळात राज्यात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिलं आहे.

कोविडच्या संकटामुळं औरंगाबादची महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ती आता येत्या काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेची निवडणुकही येत्या काळात होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपनेही कंबर कसली आहे. या निवडणुकांच्या आधी झालेल्या विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका या लिटमस टेस्ट ठरणार असल्याने भाजपासाठी महत्वाच्या होत्या. मात्र, त्यात त्यांना पाचपैकी एकाच जागेवर समाधाान मानावे लागल्याने आता पुढील निवडणुकांचं त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

News Desk

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलें सायकलवरून विधानभवनात येणार

News Desk

पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, संभाजीराजे भडकले

News Desk