HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे आंदोलन विरोधासाठी की अस्तित्व टिकवण्यासाठी ?

मुंबई: राज्य सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेने केंद्रातील भाजपविरूद्ध आवाज उठवून खळबळ उडवून दिली आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असून आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

नही चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन, ह्यनको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा, बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

देशभरात वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमधील या असंतोषाला शनिवारी शिवसेनेने वाचा फोडली. शिवसेनेने भाजप सरकारविरोधात आक्रमक होत आंदोलनाचे रणशिंग फुकले. मुंबईत ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने केली. सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपविरोधात आंदोलन करुन भाजपला अप्रत्यक्षपणे शहच दिला. शिवसैनिकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

दरम्यान, सध्या शिवसेना राज्यात सत्तेत असली तरी भाजप त्यांना कुठलही किंमत देत नाही. दुसरीकडे सत्तेत राहून विरोधकांची भूमिका निभावून शिवसेना संभाव्य पडझडीपूर्वीच पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”- आशिष शेलार

News Desk

“संजय राठोड आमचे दुश्मन नाही आणि शिवसेना तर …”,चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

News Desk

शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk