HW News Marathi
महाराष्ट्र

“संजय राठोड आमचे दुश्मन नाही आणि शिवसेना तर …”,चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मुंबई | भाजप आणि महाविकासआघाडी मध्ये सतत चालू असलेल्या कुरघोड्या सगळ्यांना माहित आहेत. मध्यंतरी भाजप आणि सेना युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा विधान केलं आहे. “संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

संजय राठोडना क्लीन चिट नाकारली, त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “संजय राठोड यांना क्लीन चीट देणं चिंताजनक आहे. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या. राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकुल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटतं.”

राठोड यांचे मंत्रिमंडळात कमबॅक?

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे अशी माहिती मिळतेय .त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.संजय राठोड यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं सांगितलं होतं.

तर दुसरीकडे आता संजय राठोड मंत्रीमंडळात परततील अशा चर्चा चालु झाल्याने भाजपने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की , “उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये तसं झाल्यास त्यांनी आंदोलनाला तोंड देण्यासाठी तयार रहावं, असा इशारा चंद्राकांत पाटील यांनी दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही क्लिनचीट न मिळाल्याचं समोर आलं आहे.

क्लीन चिट नाकारली

गृहणमंत्री दिलीप वळसे यांनी आज (१६ जुलै) माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी त्यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट देण्याचा संबंध येत नाही असंही स्पष्ट केलं आहे. ”आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही” असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून संजय राठोड यांना ‘क्लिनचिट’ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच आता त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली झाली आहे. मात्र याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार दुखावले नाहीत, पवार कुटुंबियांमध्ये अजिबात वाद नाही – जयंत पाटील

News Desk

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडेंची मेट्रो – ३ प्रकल्पातून उचलबांगडी

swarit

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk