HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे तर उपमहापौरपदी महेश सावंत

कोल्हापूर | कोल्हापूरच्या महापौरपदाची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात होती. परंतु शुक्रवारी झालेल्या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्री घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे निवडणुकीला कलाटणी मिळाल्याची चर्चा आहे.

कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौर पदासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची ४४ मते मिळाली.तर भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी संग्राम निकम यांना ३३ मते मिळाली.

उपमहापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळाली. शिवसेना या निवडणुकीत तटस्थ असली तरीही शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांना अर्ज मागे घेतला आला नाही. तसेच शिवसेनेचे ४ नगरसेवक गैरहजर राहील्यामुळे सेनेच्या चव्हाण यांना शून्य मते मिळाली. त्याचबरोबर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांचा विजय झाला. सावंत यांना आघाडीची सर्व ४४ मते मिळाली. भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा! – मुख्यमंत्री

Aprna

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘अरुणोदय झाला’ गाणे राज ठाकरेंनी केले ट्विट

swarit
मुंबई

१०० दिवस उलटले तरी मृतदेह जेजे रुग्णालयात

News Desk

मुंबई | धारावी येथे २१ जुलैला सचिन जैसवाल वय १७ वर्ष मुलाचा मृत्य झाला होता. त्याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतून झाला आहे, असा आरोप मृत मुलाच्या घरच्यांनी केला आहे. आज १०० दिवसापेक्षा अधिक दिवस होऊन गेले त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात पडून आहे.परंतु त्याचा घरच्यांनी अजुनही मृतदेह हाती घेतला नाही.कारण मुलाचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतुन झाला आहे व जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही असे मृत सचिन जैस्वाल याचा घरच्यांनी सांगितले.

१२ जुलै रोजी मोबाईल चोरी प्रकरणी सचिन जैस्वाल याला संशयावरून ताब्यांत घेतले होते २२ तास चौकशी नंतर त्याला पोलिसांनी सोडल होते. त्यानंतर १३ जुलै रोजी त्याला ताप व अंगदुखी झाली तेव्हा शेजारचा दवाखान्यात नेले होते. १५ जुलै रोजी रक्ताची उलटी आल्यामुळे सायन रुग्णालयात पुन्हा दाखल केले तिथे अतिदक्षता विभागात ५ दिवस सचिनला ठेवण्यात आले आणि मग तेथेच त्याचा मृत्यु झाला .

पोलिसांनी २२ तास केलेल्या चौकशीत सचिनला पोलसानी बेदम मारले असं स्वतः ता त्याने घरी येताच घरच्यांना सांगितले होते.त्यामुळेच त्याला अंगदुखी व ताप आला होता. तो या गुन्ह्यात नसताना देखील त्याला संवषयावरून नेऊन विचारांना करून मारधाड केली त्यामुळे तो घाबरून आजारी पडला व त्याचा मृत्यू झाला असा दावा घरचे करत आहेत. परंतु डॉक्टरानी दिलेल्या रिपोर्ट मध्ये त्याला लॅपटो स्पायरेसिस झाल्याचे आढळले आहे. त्यानेच तो आजारी पडून मृत्यु झाला आहे असे पोलीस व डॉक्टरांकडून स्पष्ट झाले आहे.

परंतु जैस्वाल कुटुंबांचे म्हणणे असे आहे की आमचा मुलगा इतके दिवस ठणठणीत होता. पोलिसांनी केलेल्या मारहानीमुळे त्याची तब्यत खालावली आणि मृत्यू झाला. पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करून हे खोटे रिपोर्ट बनवले आहेत. जर पोलिसांनी काही केलं नाही मग आम्ही त्यांचा विराधात इतक्या केलेल्या कॉम्प्लेइंट वरिष्ठ का ? नोंदवत नाहीत. या केस बद्दल पोलिसांची प्रतिक्रिया घ्यायला गेले असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Related posts

माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

News Desk

पुण्यात २१ कुत्र्यांचे हत्याकांड

News Desk

शिक्षक मतदार संघात बोगस मतदारांवर होणार कारवाई

News Desk